1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्षासोबतच नोकरदारांसाठी मोठे बदल लागू होणार आहेत. सरकारकडून नवीन इनकम टॅक्स कायदा आणि लेबर कोड लागू करण्यात येणार असून, याचा थेट परिणाम पगाराच्या रचनेवर होणार आहे.
नवीन नियमांनुसार, कर्मचाऱ्याचा Basic Salary हा एकूण CTC च्या किमान 50% असणे बंधनकारक राहील. सध्या अनेक कंपन्या बेसिक कमी ठेवून विविध भत्त्यांद्वारे पगार वाढवतात, पण आता भत्ते 50% पेक्षा जास्त ठेवता येणार नाहीत.
या बदलामुळे तुमच्या हातात येणाऱ्या पगारावर परिणाम होऊ शकतो. कारण बेसिक वाढल्यामुळे PF आणि ग्रॅच्युटीचे योगदान वाढेल, त्यामुळे दर महिन्याला मिळणारा (in-hand) पगार थोडा कमी होऊ शकतो. मात्र, याचा फायदा असा की निवृत्तीनंतर मिळणारा फंड अधिक मजबूत होईल.
टॅक्सच्या बाबतीतही बदल दिसून येतील. जुन्या कर प्रणालीत (Old Regime) HRA सवलत कमी होण्याची शक्यता आहे. तर नवीन कर प्रणाली (New Regime) निवडणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
कंपन्यांनाही आपली पेरोल प्रणाली बदलावी लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक सध्या 20-30% आहे, त्यांना तो वाढवून 50% करणे आवश्यक राहील. त्यामुळे कंपन्यांचा PF आणि ग्रॅच्युटीवरील खर्चही वाढणार आहे.

Comments are closed.