अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस ग्रामीण पोलिस भरतीच्या शारीरिक चाचणीचा आठवा दिवस उत्साहात पार पडला. शुक्रवारी एकूण २,००० उमेदवारांना बोलावण्यात आले होते.
त्यापैकी १,३६४ उमेदवार उपस्थित राहिले, तर ६३६ गैरहजर होते. उपस्थित उमेदवारांपैकी १,२७७ जणांनी प्रत्यक्ष शारीरिक चाचणीत सहभाग घेतला.
चाचणी पूर्ण झाल्यानंतर ७८४ उमेदवार यशस्वी ठरले, तर ४९२ उमेदवार अपयशी झाले. याशिवाय ८४ उमेदवार शारीरिक मापदंडांमध्ये अपात्र ठरले, तर ३ उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र घोषित करण्यात आले. एका उमेदवाराचा निकाल वैद्यकीय कारणास्तव राखीव ठेवण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले की, भरती प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रकानुसार पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. तीव्र उन्हाचा परिणाम टाळण्यासाठी आता मैदानी चाचण्या नियोजित वेळेपेक्षा दीड तास आधी सुरू केल्या जात असून उमेदवारांना सकाळी ५:३० ऐवजी पहाटे ४ वाजताच मैदानावर हजर राहण्यास सांगण्यात येत आहे.

Comments are closed.