आरटीओ अंधारात! सेवा ठप्प! | RTO in Darkness! Services Halted!

RTO in Darkness! Services Halted!

0

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वीजपुरवठा तब्बल २४ तास ठप्प राहिला. बुधवारी सायंकाळी वीज गेल्यानंतर गुरुवारी संध्याकाळपर्यंत ती सुरळीत झाली नाही. विशेष म्हणजे, कार्यालयातील जनरेटरही बंद असल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले. परिणामी, नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागले.

RTO in Darkness! Services Halted!

संगमवाडी येथील आरटीओ कार्यालयात बुधवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे लर्निंग लायसन्स व अन्य कामे ठप्प राहिली. अनेक जण आरटीओ कार्यालयात कामानिमित्त सुट्टी घेऊन आले होते. मात्र, वीज नसल्याने त्यांची कामे होऊ शकली नाहीत.

आरटीओच्या वीजपुरवठा वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने महावितरणकडून दुरुस्तीचे प्रयत्न सुरू होते. गुरुवारी सायंकाळी अखेर वीजपुरवठा पूर्ववत झाला. या प्रकारामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.

रिक्षा फेडरेशनचे बापू भावे यांनी सांगितले की, ‘बुधवार सायंकाळपासून वीजपुरवठा बंद होता आणि कार्यालयात अंधार होता. जनरेटरदेखील बंद होता. आरटीओ कार्यालयात विजेचा बॅकअप आवश्यक आहे, मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष नाही.’

दरम्यान, महापालिकेकडून आरटीओ परिसरात खोदकाम सुरू होते. त्यामुळे वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीला चार ते पाच ठिकाणी नुकसान पोहोचले. सिमेंट रस्त्यामुळे दुरुस्तीला अधिक वेळ लागला, मात्र गुरुवारी सायंकाळी अखेर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.