RTE शुल्क प्रतिपूर्ती ‘जैसे थे’!-RTE Fee Reimbursement Fixed 2025–26!

RTE Fee Reimbursement Fixed 2025–26!

शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी RTE अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीचा दर निश्चित करण्यात आला आहे.महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग यांच्याकडून याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून, यंदाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रति विद्यार्थी ₹17,670 इतकीच प्रतिपूर्ती मिळणार आहे.

RTE Fee Reimbursement Fixed 2025–26!यावर्षी प्रतिपूर्ती दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापनांना होती. मात्र, शासनाने मागील वर्षीचा दर कायम ठेवत ‘जैसे थे’ निर्णय घेतला आहे. RTE प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शाळा नोंदणी पूर्ण झाली असून, आता प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांमागे किती रक्कम मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

प्रतिपूर्ती करताना अटी व पडताळणी
शाळांनी RTE मान्यतेचे प्रमाणपत्र जोडणे, विद्यार्थी प्रत्यक्ष शिकत असल्याची नोंद ‘सरल’ व RTE पोर्टलवर तपासणे आणि आधार नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांनाच ग्राह्य धरणे बंधनकारक आहे. तसेच, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी फक्त २५% विद्यार्थ्यांपुरतीच प्रतिपूर्ती लागू राहणार आहे.

महत्त्वाची तरतूद
ज्या शाळांना जमीन, इमारत किंवा सुविधा मोफत अथवा सवलतीत मिळाल्यामुळे ठरावीक संख्येतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची अट आहे, अशा शाळांना त्या मर्यादेपर्यंत शुल्क प्रतिपूर्ती मिळणार नाही, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed.