आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. शासनाने प्राथमिक शिक्षण संचलनालयाला शासकीय आदेशाद्वारे प्रक्रियेस मंजुरी दिली असून, तारखेचा थेट उल्लेख नसला तरी तयारीला वेग आला आहे. यंदा प्रती विद्यार्थी १७,६७० रुपये शुल्क शाळांना दिले जाणार आहे.
यावेळी नियमांत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पालकांना अर्ज करताना विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटरच्या आतल्या शाळाच निवडता येतील. ‘गुगल लँडमार्क’च्या आधारे अंतर निश्चित करूनच अर्ज भरावा लागणार आहे.
दोन महिन्यांच्या विलंबानंतर हा निर्णय झाला असून, याबाबत सामाजिक संघटना व पालकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या विषयावर लोकमत ने ८ फेब्रुवारीला वृत्त दिले होते.
विनाकारण प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पालकांची तक्रार खरी ठरल्यास संबंधित शाळा दोषी धरल्या जातील.

Comments are closed.