आरटीई प्रवेश 2025-26: प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी! | RTE Admission: Big Chance!

RTE Admission: Big Chance!

0

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश आजपासून (18 मार्च) सुरू होत आहेत. प्रवेश निश्चित करणाऱ्या पालकांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाणार असून, आरटीई पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासणेही आवश्यक आहे.

RTE Admission: Big Chance!

अद्याप रिक्त जागा – प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी!
राज्यातील 25% राखीव जागांपैकी 69,624 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. मात्र, 39,463 जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील 85,457 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.

पालकांनी हे लक्षात ठेवा!
फक्त एसएमएसवर अवलंबून राहू नका! – आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ टॅबवर जाऊन आपल्या मुलाच्या अर्जाची स्थिती तपासा.
ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढा आणि आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी केंद्रावर हजर राहा.
18 ते 24 मार्चदरम्यान दस्तऐवज पडताळणी करून प्रवेश निश्चित करा.

प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण करावी?
पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या पडताळणी केंद्रात जाऊन पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करावा. प्रवेशाची पावती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा.

महत्त्वाची लिंक:
अधिक माहितीसाठी आरटीई पोर्टलला भेट द्या!

Leave A Reply

Your email address will not be published.