शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५% आरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा ९ जानेवारीपासून सुरू झाला आहे.

या टप्प्यात शाळांची ऑनलाइन नोंदणी आणि पडताळणी सुरू आहे. शाळा पडताळणी करताना बंद शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित शाळा आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट केली जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच शाळांना मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाच्या नोंदीची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. कोणतीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती नोंदवू नये, अशी सूचना शाळांना देण्यात आली आहे.

Comments are closed.