रेल्वेत २५६९ पदांसाठी मोठी भरती!-RRB Recruitment: 2569 Vacancies!

RRB Recruitment: 2569 Vacancies!

भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे भरती बोर्डाने तब्बल २५६९ पदांसाठी भरती जाहीर केली असून, ही भरती प्रयागराज झोनअंतर्गत होणार आहे. या भरतीत ज्युनिअर इंजिनियर, डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट, आणि केमिकल व मेटलर्जिकल असिस्टंट या पदांचा समावेश आहे.

 RRB Recruitment: 2569 Vacancies! ही भरती CEN 05/2025 अंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल, सिग्नलिंग आणि आयटी विभागांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री केलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे.

या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. भरती प्रयागराज आरआरबी, उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, आणि बनारस लोकोमोटिव वर्क्स या विभागांसाठी करण्यात येणार आहे. यामध्ये १०९० पदे सामान्य प्रवर्गासाठी असून उर्वरित पदे राखीव प्रवर्गासाठी राखीव आहेत. निवड झाल्यानंतर उमेदवारांना ₹३५,४०० रुपये वेतन मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ rrbapply.gov.in किंवा प्रयागराजच्या प्रादेशिक संकेतस्थळ rrbpryj.gov.in वर जावे लागेल. तेथे अकाउंट तयार करून ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ₹५०० तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹२५० अर्ज शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया संगणक आधारित परीक्षेद्वारे (CBT) होईल. पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण परीक्षा घेतली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक विषयांची परीक्षा होईल.

यानंतर वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणी करण्यात येईल. भारतीय रेल्वेत करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी असून, योग्य तयारी करून या भरतीत यश मिळवणे शक्य आहे.

Comments are closed.