RRB NTPC टायपिंग प्रवेशपत्र जाहीर!-RRB NTPC Typing Test Admit Card Out!

RRB NTPC Typing Test Admit Card Out!

RRB NTPC 2026 टायपिंग कौशल्य चाचणीसाठी प्रवेशपत्रे जाहीर झाली आहेत. Railway Recruitment Board कडून ही प्रवेशपत्रे प्रसिद्ध करण्यात आली असून, CBT-2 लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना ती डाउनलोड करता येणार आहेत.

RRB NTPC Typing Test Admit Card Out!संबंधित प्रादेशिक RRB च्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी त्वरित प्रवेशपत्र मिळवावे.

प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल?
उमेदवारांनी प्रथम आपल्या प्रादेशिक RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. होमपेजवर “NTPC Typing Skill Test city slip / e-call letter” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणी क्रमांक व जन्मतारीख टाकून सबमिट केल्यावर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करून प्रिंटआउट घ्यावा.
टायपिंग चाचणी वेळापत्रक
रेल्वे बोर्डाच्या माहितीनुसार, ही टायपिंग कौशल्य चाचणी फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे. सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी ही चाचणी बंधनकारक आहे.

Comments are closed.