RRB NTPC अर्जाची मुदत वाढली – पदवीधर व बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी! | RRB NTPC Deadline Extended – Big Opportunity!

RRB NTPC Deadline Extended – Big Opportunity!

रेल्वे भरती मंडळाकडून (RRB) NTPC 2025 भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. एकूण ८,८६८ पदांसाठी पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. आता उमेदवारांना २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्याची संधी दिली आहे. rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करता येणार आहेत.

RRB NTPC Deadline Extended – Big Opportunity!

या भरतीत ५,८१० पदवीधर स्तरावरील आणि ३,०५८ पदवीपूर्व (१२वी स्तरावरील) जागांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया पदवीधरांसाठी २१ ऑक्टोबरपासून, तर १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २८ ऑक्टोबरपासून सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अट आणि कागदपत्रे यांची पडताळणी करूनच अर्ज करावा.

RRB NTPC 2025 भरतीत स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, क्लर्क, टायपिस्ट, तिकीट क्लर्क इत्यादी विविध पदांचा समावेश आहे. उमेदवारांना CBT 1, CBT 2, कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी या टप्प्यांतून जावं लागणार आहे. अर्ज करताना फोटो, सही, शैक्षणिक कागदपत्रे, जात/ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन स्वरूप जवळ ठेवणे गरजेचे आहे.

अर्जासाठी सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी शुल्क ₹500, तर SC/ST/PwD/महिला/अल्पसंख्याक/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ₹250 इतकं शुल्क आहे. पहिल्या CBT परीक्षेला हजेरी लावल्यानंतर शुल्काचा मोठा भाग परत मिळतो.

रेल्वे भरती मंडळाने सर्व RRB विभागांचे स्वतंत्र संकेतस्थळे उपलब्ध करून दिली असून, अर्ज स्थिती, परीक्षा अपडेट्स, प्रवेशपत्र, निकाल इत्यादीची माहिती उमेदवारांना त्यांच्या संबंधित विभागाच्या वेबसाइटवरून मिळणार आहे.

अर्ज सादर करण्यापूर्वी संपूर्ण माहिती बारकाईने तपासावी, फॉर्म नीट भरावा आणि शेवटची तारीख टाळून वेळेत सबमिट करावा, असा सल्ला RRB कडून देण्यात आला आहे.

Comments are closed.