रेल्वे Group-B परीक्षा तारखा जाहीर!-RRB Group-B Exam Dates Out!

RRB Group-B Exam Dates Out!

भारतीय रेल्वेतील Group-C कर्मचाऱ्यांसाठी अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे बोर्डाने Group-B पदांवर पदोन्नतीसाठी होणाऱ्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) चा अधिकृत वेळापत्रक जाहीर केला आहे.

RRB Group-B Exam Dates Out!ही परीक्षा ८ मार्च २०२६ रोजी देशभरात कंप्युटर आधारित चाचणी (CBT) स्वरूपात होणार असून, संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी RRB अजमेर कडे सोपवण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी किमान ५ वर्षांची सेवा पूर्ण केलेले Group-C मधील सुमारे १.७५ लाख कर्मचारी अर्ज करतील, अशी शक्यता आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस ठेवण्यात आली असून ती HRMS पोर्टलवर हलवण्यात आली आहे. १५ डिसेंबरपासून अर्ज मॉड्यूल लाईव्ह झाले असून, २२ डिसेंबरला अधिकृत अधिसूचना जाहीर होणार आहे.

अर्जांची तपासणी प्रक्रिया २३ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर ८ मार्चला परीक्षा होईल आणि ६ एप्रिल २०२६ पर्यंत निकाल जाहीर केले जातील. ही भरती मोहीम १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ या रिक्त पदांच्या चक्रासाठी आहे.

विशेष बाब म्हणजे, रेल्वे प्रशासनाने दूरदृष्टी दाखवत जून २०२७ पर्यंत संभाव्य रिक्त होणारी पदेही या प्रक्रियेत समाविष्ट केली आहेत. त्यामुळे एका परीक्षेतूनच मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.

Comments are closed.