रेल्वेत 311 जागांची भरती!-RRB Announces 311 Vacancies!

RRB Announces 311 Vacancies!

रेल्वे नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) २०२६ साठी ३११ पदांच्या भरतीचा शॉर्ट नोटीस जाहीर केला आहे. या भरतीअंतर्गत विविध ‘आयसोलेटेड कॅटेगरी’तील पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

RRB Announces 311 Vacancies!या भरतीत वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक, लॅब असिस्टंट ग्रेड-३, मुख्य विधी सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कर्मचारी व कल्याण निरीक्षक, सरकारी वकील तसेच वैज्ञानिक सहाय्यक (प्रशिक्षण) अशा विविध पदांचा समावेश आहे. सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज स्वीकारले जातील.

उमेदवारांचे वय साधारणतः १८ ते ४० वर्षांदरम्यान (पदानुसार बदल) असावे लागणार असून, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शैक्षणिक पात्रता व अनुभवाची अट आहे. नोंदणीची अंतिम तारीख २९ जानेवारी २०२६ आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असून, अधिकृत माहितीसाठी उमेदवारांनी संबंधित प्रादेशिक RRB संकेतस्थळे तपासावीत.

रेल्वेत प्रतिष्ठित पदावर संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

Comments are closed.