राइट्स लिमिटेड अंतर्गत ६०० पदांसाठी भरती ; अधिक माहिती जाणून घ्या !-RITES Ltd Recruitment 600 Posts!

RITES Ltd Recruitment 600 Posts!

रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस (RITES) लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कंपनीने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने ६०० रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे.

RITES Ltd Recruitment 600 Posts!इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करणे आवश्यक आहे, कारण अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०२५ आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल किंवा केमिस्ट्रीमध्ये डिप्लोमा/बीएससी पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय, उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठी पात्रताही वेगवेगळी आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पात्रता तपासणे महत्वाचे आहे.

अर्ज शुल्क उमेदवारांच्या श्रेणीप्रमाणे ऑनलाइन भरावे लागेल. सामान्य/ओबीसी वर्गासाठी ₹३०० आणि ईडब्ल्यूएस/एससी/एसटी/पीडब्ल्यूडीसाठी ₹१०० शुल्क आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतरच अर्ज स्वीकारला जाईल.

निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल, ज्यामध्ये १२५ प्रश्न विचारले जातील. पात्र उमेदवारांना दरमहा ₹१६,३३८ ते ₹२९,७३५ पगार दिला जाईल. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ rites.com वरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन अर्ज करावा.

Comments are closed.