शिक्षकीकडे तरुणांचा वाढता ओढा!-Rising Youth Interest in Teaching!

Rising Youth Interest in Teaching!

राज्यात एकीकडे शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढत असले तरी दुसरीकडे शिक्षकी पेशाकडे तरुणांचा, विशेषतः महिलांचा कल कायम असल्याचे चित्र दिसत आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी बी.एड. प्रवेश प्रक्रियेत 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Rising Youth Interest in Teaching!यंदा 1,09,485 विद्यार्थ्यांनी बी.एड. साठी अर्ज केले, तर एम.एड. आणि एम.पी.एड. मिळून एकूण 1,16,122 विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत थोडी घट असली तरी हा आकडा अजूनही मोठा असल्याने शिक्षकी क्षेत्राची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते.

तज्ज्ञांच्या मते, शिक्षकी पेशा हा सुरक्षित, स्थिर आणि सन्मानजनक करिअर म्हणून ओळखला जातो. विशेषतः महिला वर्गासाठी हा एक विश्वासार्ह पर्याय मानला जात असल्याने त्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत आहेत, तसेच खाजगी व स्वयं-अर्थसहाय्यित शाळांची संख्या वाढल्याने नोकरीच्या संधीही वाढल्या आहेत. याशिवाय, शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतींचा वाढता वापर यामुळेही तरुणांना या क्षेत्राकडे आकर्षण वाटत आहे.

Comments are closed.