शिक्षक शालार्थ सुधारित कार्यपद्धती-Revised Staff ID & Approval Process

Revised Staff ID & Approval Process

राज्यातील खाजगी, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका अनुदान शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्यासाठी नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.

Revised Staff ID & Approval Processया प्रक्रियेत शिक्षक/कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश प्रथम शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षकांकडे सादर केले जातील. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक शालार्थबाबत निर्णय घेतील. प्रस्ताव मान्य झाल्यावर शालार्थ आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह निर्गमित केले जातील.

उच्च माध्यमिक स्तरावरील वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीसाठीही समान प्रक्रिया लागू आहे. आदेश, नियुक्ती अहवाल व वैयक्तिक मान्यता दस्तऐवज शालार्थ पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच 2012 ते 2016 या कालावधीत निर्गमित न झालेल्या शालार्थ आयडींसाठीही संबंधित कागदपत्रांची पडताळणी व अपलोड करणे आवश्यक आहे.

अनियमितता आढळल्यास, शिक्षण अधिकारी किंवा विभागीय अधिकारी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आहेत. सर्व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आदेशांची संग्रहीत प्रत राखणे अनिवार्य आहे.

Comments are closed.