महसूल सेवकांना प्राधान्य ! – Revenue Servants Priority !

Revenue Servants Priority !

राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न आता मार्गी लावण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, राज्यात कोतवाल म्हणून काम करणाऱ्या महसूल सेवकांना त्यांच्या अनुभवाच्या आधारावर तलाठी भरतीत प्राधान्य दिले जाईल.

Revenue Servants Priority !यामुळे अनुभवी महसूल सेवकांना तलाठी पदांवर सहज निवड मिळण्याची संधी वाढेल. उच्चस्तरीय बैठकीत या महसूल सेवकांसाठी काही जागा राखीव ठेवण्याचा निर्णयही घेतला गेला आहे, ज्यामुळे संबंधित वर्गातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बैठकीत महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करून मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्याची मागणी विचारात घेण्यात आली होती, परंतु सध्याच्या नियमांनुसार हे शक्य नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पर्याय म्हणून महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देण्याचा निर्णय झाला. याच प्रक्रियेत, ज्यांना किमान पाच वर्षांचा अनुभव आहे, त्यांना २५ अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच शासन निर्णय (GR) जारी होण्याची शक्यता आहे.

हा निर्णय महसूल सेवकांसाठी फक्त रोजगाराची संधी नव्हे तर त्यांच्या कारकीर्दीसाठी मोठा प्लस पॉईंट ठरणार आहे. या उपाययोजनेमुळे राज्यातील तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची व्यवस्था सुनिश्चित होणार आहे.

Comments are closed.