रेल्वे परीक्षेत श्रद्धेला परवानगी!-Religious Symbols Allowed in RRB!

Religious Symbols Allowed in RRB!

रेल्वे भरती परीक्षा देणाऱ्या भावनाशील उमेदवारांसाठी मोठा दिलासा मिळालाय. आधी धार्मिक चिन्हं – जसं की हातात कडं, दोरा, डोक्यावर पगडी वगैरे घेऊन जाणं बंदीचं होतं.

Religious Symbols Allowed in RRB!रेल्वेकडून असं म्हणण्यात आलं होतं की, या वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट लपवलं जाऊ शकतं, म्हणून परीक्षा पारदर्शक ठेवण्यासाठी बंदी होती.

पण आता विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर ठेवत हा नियम मागे घेण्यात आलाय. आता उमेदवारांना त्यांच्या धार्मिक प्रतीकांसह परीक्षा द्यायला परवानगी आहे – पण संपूर्ण तपास प्रक्रियेला सहकार्य केलं तरच!

हा नियम फक्त रेल्वेच्या परीक्षांसाठीच लागू आहे.
कर्नाटक आणि पंजाबमधील घटनांनंतर विद्यार्थ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय.
रेल्वेने याबाबत अधिकृत नोटिफिकेशन देखील जारी केलंय.

Comments are closed.