एसटीआय पदवाढीला हिरवा कंदील!-Relief on STI Post Hike!

Relief on STI Post Hike!

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सर्व उमेदवारांना समान व न्याय्य संधी मिळावी, या भूमिकेतून एसटीआय पदसंख्या वाढवण्याची ठोस मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी पुढे रेटली आहे.

या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले असून, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाला आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा २०२५ अंतर्गत जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत एसटीआय पदांच्या एकूण २७९ जागांचा उल्लेख होता. मात्र, या सर्व जागा आरक्षित प्रवर्गांसाठीच असल्याने खुल्या प्रवर्गासाठी एकही पद नसल्याचे समोर आले. या निर्णयामुळे राज्यभरातील खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

ही अन्यायकारक बाब उमेदवारांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. ३१ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. एसटीआय पदसंख्येत त्वरित वाढ करून त्यातील अधिकाधिक जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवाव्यात, अशी स्पष्ट व ठाम भूमिका त्यांनी मांडली असून, त्यावर शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

Comments are closed.