कामगार योजना: नोंदणी करा!-Register for Worker Schemes!

Register for Worker Schemes!

कामगार विभागाकडून मिळणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा खरा फायदा कामगारांच्या लेकरांना व्हावा, यासाठी कामगारांनी कल्याणकारी मंडळात नोंदणी करणं अतिशय गरजेचं असल्याचं सहायक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार यांनी सांगितलं.

Register for Worker Schemes!बांधकाम कामगारांच्या गणवंत मुलांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

पवार म्हणाले, “मंडळात योग्य पुराव्यानिशी नाव नोंदवलं तर शिक्षणासह इतर अनेक योजना कामगार कुटुंबांना उपलब्ध होतात. पण अनेक कामगार नोंदणीच करत नाहीत, म्हणून मोठा निधी वापरला जात नाही. हे बदलायला हवं. ऑनलाइन नोंदणी करून स्मार्ट कार्ड घ्या आणि योजनांचा लाभ घ्या.”

या कार्यक्रमाला क्रिकेटपटू केदार जाधव, समृद्धी जाधव, ‘बीएआय’चे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सचिव मनोज देशमुख, अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. केदार जाधव यांनी विद्यार्थ्यांना संयम, सराव, आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवण्याचे मार्गदर्शन केले. जगन्नाथ जाधव यांनी आत्मविश्वास आणि वेळ पाळण्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आपटे यांनी केले.

Comments are closed.