पवित्र पोर्टलद्वारेच भरती करा!-Recruit via Pavitra Portal Only!

Recruit via Pavitra Portal Only!

राज्यात उच्च शिक्षण विभागात तब्बल ५५०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं रिक्त असून, ही सर्व भरती फक्त पवित्र पोर्टलद्वारेच व्हावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Recruit via Pavitra Portal Only!नुकताच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या भरतीचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा केली होती. मात्र मागील भरती प्रक्रियेत ७० लाख ते १ कोटीपर्यंत लाचेचे आरोप झाल्यामुळे, यावेळी सर्व भरती पारदर्शकपणे आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच व्हावी, असा आग्रह धरण्यात आलाय.

त्याचबरोबर, पूर्वी शालार्थ आयडी मिळवण्यात झालेल्या भ्रष्टाचारावरही शिक्षक परिषदेने टीका केली आहे आणि एसआयटी चौकशी करून जबाबदार संचालकांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली आहे.

माजी आमदार नागो गाणार आणि कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी याबाबत पत्र पाठवून स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Comments are closed.