ईपीएफओत मध्ये तब्बल २१ लाख ८९ हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी !-Record Spike in EPFO Enrolment!

Record Spike in EPFO Enrolment!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ‘ईपीएफओ’त जून महिन्यात तब्बल २१ लाख ८९ हजार कर्मचाऱ्यांची विक्रमी नोंदणी झालेली आहे. एप्रिल २०१८ पासून तात्पुरत्या वेतनाधारित आकडेवारीप्रमाणे जारी होणाऱ्या अहवालांमध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी भर असल्याचं कामगार मंत्रालयाने सांगितलं.

Record Spike in EPFO Enrolment!जून २०२५ मध्ये एकटं १० लाखांहून जास्त नव्या सदस्यांची नोंदणी झाली. मे महिन्याच्या तुलनेत यात १२.६ टक्क्यांनी वाढ, तर मागच्या वर्षीच्या तुलनेत ३.६१ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

या महिन्यात नव्याने ६.३९ लाख तरुण (१८-२५ वयोगट) सदस्य झाले, ज्यामुळं तरुणांचा रोजगाराकडं कल दिसतोय. याशिवाय ३.०२ लाख नव्या महिला सदस्य आणि एकूण ४.७२ लाख महिला सदस्यांची नोंदणी झाली.

जुन महिन्यात १६.९० लाख सदस्यांनी ईपीएफओमध्ये पुन्हा प्रवेश घेतला. महाराष्ट्रानं यामध्ये आघाडी घेतली असून, एकट्या राज्यात २० टक्क्यांहून अधिक नोंदणी झाली. शिक्षण व बांधकाम क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.

मंत्रालयाने सांगितलं की, ह्या वाढीचं मुख्य कारण म्हणजे वाढलेल्या रोजगार संधी, ईपीएफओ योजनांची माहिती आणि प्रचार कार्यक्रमांमुळे लोकांची जागरूकता वाढलेली आहे.

Comments are closed.