‘लाडकी बहीण’साठी विक्रमी अर्ज! – Record Rush for ‘Ladki Bahin’!

Record Rush for ‘Ladki Bahin’!

राज्य सरकारच्या लोकप्रिय ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून तब्बल १४ लाख ६५ हजार ८७६ अर्ज सादर झाले आहेत. त्यापैकी १४ लाख ४१ हजार ७९८ अर्ज पात्र, तर २४ हजार ७८ अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Record Rush for ‘Ladki Bahin’!दरमहा पात्र महिलांच्या खात्यात ₹१,५०० चे अनुदान जमा केले जाते. मात्र, लाभ सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.

ही पडताळणी आधार आणि बँक खात्याशी संबंधित असून ती अंगणवाडी, ग्रामपंचायत, महिला बालविकास कार्यालय किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये करता येईल.

ठाण्यातील ९,१५,६९६ महिलांनी ऑनलाइन अर्ज, तर ‘नारी शक्ती दूत’ अॅपमार्फत ५,५०,१८० अर्ज सादर केले आहेत. जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी स्पष्ट केले की, निर्धारित मुदतीत ई-केवायसी न झाल्यास अनुदानाची पुढील रक्कम तात्पुरती स्थगित राहील

Comments are closed.