रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठी कारवाई करत तीन प्रमुख सरकारी बँकांवर आर्थिक दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून एकूण ₹2.17 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे.
यामध्ये यूनियन बँक ऑफ इंडियावर ₹95.40 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियावर ₹63.60 लाख आणि बँक ऑफ इंडियावर ₹58.50 लाख दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय फिनटेक कंपनी Pine Labs वरही ₹3.10 लाखांचा दंड लावण्यात आला आहे.
यूनियन बँकेने फसवणूक व्यवहारांची योग्य व वेळेवर नोंद करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली नव्हती. बँक ऑफ इंडियाने प्राथमिक क्षेत्रातील कर्जांवर अनावश्यक शुल्क आकारले आणि नियमांचे उल्लंघन केले. तर सेंट्रल बँकेकडून KYC नियमांचे पालन करण्यात त्रुटी आढळल्या तसेच काही ग्राहकांची माहिती योग्यरित्या अपडेट करण्यात आली नव्हती.
पाइन लॅब्सने प्रीपेड पेमेंटसंबंधित नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. यापूर्वी RBI ने HSBC बँकेवरही निष्क्रिय खाती व न मिळालेल्या ठेवींविषयी नियम मोडल्यामुळे दंड ठोठावला होता.
RBI ने सर्व संबंधित संस्थांना आधी नोटीस देऊन स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Comments are closed.