RBIचा मोठा निर्णय !-RBI Cancels Bank License !

RBI Cancels Bank License !

भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील शिमशा सहकारा बँक नियमिता या बँकेचा बँकिंग परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. दीर्घ काळ न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणानंतर हा निर्णय तात्काळ लागू झाला असून बँकेला आता कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत.

RBI Cancels Bank License !आरबीआयने जुलै २०२४ मध्येच बँकेचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिला होता. मात्र बँकेने कर्नाटक उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने काही काळासाठी स्थगिती दिली होती.

१७ फेब्रुवारी २०२६ रोजी ही याचिका मागे घेण्यात आल्याने न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यामुळे आरबीआयचा जुना आदेश पुन्हा लागू झाला आणि बँकेचा परवाना रद्द करण्यात आला.

परवाना रद्द झाल्यानंतर बँक आता नवीन ठेवी स्वीकारू शकत नाही, पैसे काढण्याची सुविधा देऊ शकत नाही किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकत नाही. त्यामुळे बँकेचे व्यवहार पूर्णपणे बंद झाले आहेत.

ग्राहकांच्या ठेवींबाबत DICGC नियमांनुसार प्रति खातेदार ₹५ लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित मानली जाते. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमाकर्त्यांना त्यांच्या पैशांबाबत अधिकृत मार्गाने माहिती दिली जाणार आहे.

Comments are closed.