आरबीआय असिस्टंट भरती 2026!-RBI Assistant Recruitment 2026!

RBI Assistant Recruitment 2026!

Reserve Bank of India मध्ये नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आरबीआयकडून ‘असिस्टंट’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून मुंबई आणि नागपूर कार्यालयांतर्गत एकूण २६६ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

RBI Assistant Recruitment 2026!मुंबई ऑफिससाठी २४९ तर नागपूर ऑफिससाठी १७ पदे उपलब्ध आहेत. संबंधित राज्याची स्थानिक भाषा येणे आवश्यक आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी किमान ५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अजा/अज व दिव्यांग उमेदवारांसाठी गुणांची अट शिथिल आहे. वयोमर्यादा २० ते २८ वर्षे असून आरक्षित प्रवर्ग, विधवा/परित्यक्ता महिला व दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. पूर्व परीक्षा ११ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल, तर मुख्य परीक्षा ७ जून २०२६ रोजी होईल. दोन्ही परीक्षा ऑनलाइन असतील. मुख्य परीक्षेनंतर गुणवत्तेनुसार उमेदवारांची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट (LPT) घेतली जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे ₹५८,५१४ ते ₹६२,८६४ इतके आकर्षक वेतन मिळेल. अजा/अज/इमाव/दिव्यांग उमेदवारांसाठी प्री-एक्झाम ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मार्च २०२६ असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.

Comments are closed.