रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने हा मेळावा २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पटवर्धन हायस्कूलमध्ये आयोजित केला जात आहे.
या मेळाव्याद्वारे जिल्ह्यातील बेरोजगारांना विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. जिल्ह्यातील सर्व खासगी कंपन्या व उद्योजकांनी www.mahaswayam.gov.in पोर्टलवर आपली रिक्त पदे नोंदवावी, असे प्र. सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी आवाहन केले आहे.
या पोर्टलद्वारे उपलब्ध युझर आयडी व पासवर्ड वापरून रिक्त पदे जाहीर करावी आणि मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची निवड करून नोकरी द्यावी, असा सल्ला दिला आहे.
अजून नोंदणी न केलेल्या कंपन्यांनी त्वरित जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी येथे संपर्क करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.