OMG! १० वी पासला रेल्वे मध्ये सरळ नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज सुरु,तब्बल ११५४ जागा!

रेल्वे भरती २०२५: नवीन रिक्त पदांची माहिती

0

१० वी पास उमेदवारांना रेल्वे मध्ये नोकरीची मस्त संधी चालून आली आहे. या द्वारे आपल्याला रेल्वेत सरळ सरकारी नोकरी मिळू शकते.  रेल्वे मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी ही एक मोठी बातमी आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेच्या ११५४ अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. उमेदवार rrcecr.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी २०२५ आहे. या भरतीमध्ये विविध डिव्हिजनमध्ये भरती केली जाणार आहे, त्यामुळे ज्या तरुणांनी नुकताच शिक्षण पूर्ण केला आहे, त्यांच्यासाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. 

Indian Railway Bharto 2025

नोटिफिकेशननुसार, या प्रक्रियेमार्फत ईस्ट सेंट्रल रेल्वेच्या विविध विभागांमध्ये अप्रेंटिसच्या एकूण ११५४ पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी निवड दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. मात्र, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. याशिवाय, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अनिवार्य आहे. पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर १४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर तपासणी करता येईल.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी किमान उत्तीर्ण केले असावे. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारे केली जाईल, त्यात १०वी आणि आयटीआयमध्ये चांगले गुण मिळवले असावे लागतील. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

या भरतीमध्ये अर्ज करताना १०० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे, मात्र राखीव प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना शुल्कात सूट आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील आणि पूर्व मध्य रेल्वेच्या rrcecr.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.