सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॉमर्स विभागातर्फे ‘जॉब फेअर २०२४’ चे आयोजन | Pune University Job Fair Registration

Pune University Job Fair Registration

0

Pune University Job Fair Registration: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॉमर्स विभागातर्फे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जॉब फेअर २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. १२ जून रोजी विद्यापीठाच्या कॉमर्स विभागात होणाऱ्या या मेळाव्यात १४ पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॉमर्स विभाग व आयसीए एज्यु स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कंपन्या

या मेळाव्यात एसएसएलए चार्टर्ड अकाउंटंट्स, कनेक्ट बिझनेस सोल्युशन, ग्लोबल पार्टनर्स, परम कॉर्पोरेशन लिमिटेड, सापिओ अॅनालिटिक्स, कंपनी बेचो प्रायवेट लिमिटेड, टाईम्स ग्रुप, सिएल एचआर सर्विसेस लिमिटेड, ऑफशोर अकाउंटींग अँड टॅक्सेशन सर्विसेस प्रा. लि, Nexdigm आदीं सारख्या १४ नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

Read This – यंदा वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व | Vat Purnima Date

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेळाव्यासाठी पात्रता 

या मेळाव्यात बी.कॉम, बी.बी.ए, बी.ए, एम.कॉम आणि एम.बी.ए पास विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात राज्यातील सर्व विद्यापीठातील पदवीधारक विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मेळावा २०२४ साठी कुठे नोंदणी करायची ?

इच्छूक उमेदवार ८६१७२५४८६५ या क्रमांकावर नोंदणी करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. नोंदणीकृत उमेदवारांसाठी यावेळी रोजगारासंबंधी मार्दर्शनपर वर्कशॉपही आयोजित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.