सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थिती आता गंभीर आहे. एकूण ३८४ प्राध्यापक पदांपैकी २३८ पदं रिक्त आहेत. सध्या फक्त १० प्राध्यापक विद्यापीठात कार्यरत आहेत. यामुळे शैक्षणिक घडामोडी मंदावल्या आहेत आणि संशोधनासाठीची इकोसिस्टम कोलमडली आहे.
विद्यापीठात ४२ शैक्षणिक विभाग आहेत, त्यापैकी बायोटेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, भूगोल, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र, पॉलिटिक्स अँड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, समाजशास्त्र विभागात प्रत्येकी फक्त १ प्राध्यापक कार्यरत आहे, तर वनस्पतीशास्त्र विभागात २.
याच परिस्थितीमुळे राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग (NIRF) मध्ये विद्यापीठाचे रँकिंग ३७ वरून थेट ९१ वर घसरले आहे. कुलगुरूंनी राजीनामा द्यावा अशी मागणीही जोर धरत आहे.
सरकारची भूमिका फक्त बघ्याची असल्यामुळे प्राध्यापक भरती प्रक्रिया रखडली आहे. विद्यमान ३८४ पदांपैकी फक्त १४६ प्राध्यापक कार्यरत, २३८ पदे रिक्त आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ५८६ पदांवर कर्मचारी कार्यरत, ६५२ जागा रिक्त आहेत.
पुढील काही वर्षांत ही रिक्त पदे भरली गेली नाही तर विद्यापीठाची शैक्षणिक आणि संशोधन स्थिती अधिक बिकट होऊ शकते, मराठी विद्यापीठाचे मानांकन खालच्या स्तरावर जाईल.

Comments are closed.