पुण्यातील NDAमध्ये १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, नोकरीची सुवर्णसंधी!
नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA), पुणे यांनी गट-सी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. गट-सीच्या विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्या उमेदवारांना NDA मध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते NDA पुणेच्या अधिकृत वेबसाइट http://www.ndacivrect.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. NDA भरती अधिसूचनेनुसार, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ, ड्राफ्ट्समन यासह विविध गट सी पदांसाठी या भरती मोहिमेत एकूण १९८ रिक्त जागा भरल्या जातील. २७ जानेवारी २०२४ रोजी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ती १७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे.
- पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ
- पदसंख्या – 198 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – www.nda.nic.in
NDA Recruitment 2024 कोण अर्ज करू शकतो
उमेदवार १०वी, १२वी उतीर्ण असावा आणि काही पदांसाठी मान्यताप्राप्त मंडळाकडून ITI डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
NDA Recruitment 2024 वयोमर्यादा
पात्र अर्जदारांचे वय किमान १८ वर्षे असावे. काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे तर काहींसाठी २५ वर्षे आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NDA Pune Application 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/bfqFM |
📑 ऑनलाईन अर्ज करा |
shorturl.at/hjCHO |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.nda.nic.in |