पुण्यात घरांची मोठी लॉटरी!-Pune MHADA Announces 3,000 Homes!

Pune MHADA Announces 3,000 Homes!

पुणे आणि परिसरात परवडणाऱ्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या ४,१८६ घरांच्या सोडतीनंतर, येत्या मार्च महिन्यात पुणे मंडळामार्फत आणखी ३,००० घरांची नवी लॉटरी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

Pune MHADA Announces 3,000 Homes!नुकत्याच पार पडलेल्या संगणकीय सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथील घरांसाठी २ लाख १५ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे पुणे परिसरात घरांची मागणी किती मोठी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

म्हाडाच्या आगामी सोडतीबरोबरच शिरूर, ताथवडे, खराबवाडी आणि म्हाळुंगे आदी भागांतील गृहप्रकल्प वेगाने सुरू आहेत. काही प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच तेथील निवासी व व्यापारी गाळेही सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय सोलापूर, बारामती आणि पुरंदरमध्येही नवीन प्रकल्प आकार घेत आहेत.

दरम्यान, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत खासगी बिल्डरांकडून होणाऱ्या मनमानीला आळा घालण्यात आला असून, वाढीव शुल्क रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, ऑनलाइन आणि मानवी हस्तक्षेपाविना राबवली जात असून, विजेत्यांनी ठरलेल्या कालावधीत डिजिटल प्रणालीद्वारे घराचा स्वीकार कळवावा, असेही म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.