पुणे जिल्ह्यात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये ३०० पेक्षा अधिक पदांसाठी थेट भरती केली जाणार आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये किमान १०वी उत्तीर्ण, १२वी, आयटीआय, पदविकाधारक आणि पदवीधर उमेदवार सहभागी होऊ शकतात. ट्रेनी, टेक्निशियन, स्टोअर हेल्पर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, फायनॅन्शल कन्सल्टंट, वेल्डर, फिटर, एचआर, हाऊसकिपिंग व सिक्युरिटी गार्ड अशा विविध पदांसाठी संधी उपलब्ध आहेत.
इच्छुक उमेदवारांनी महा-स्वयं पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून, मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी मिळणार आहे.

Comments are closed.