पुण्यात २० सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील मातंग समाजातील अभियंता उद्योजकांसाठी ‘अभियंता उद्योजक’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), पुणे कडून करण्यात आले आहे.
कार्यशाळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत COEP अभियांत्रिकी विद्यापीठ, पुणे येथे होणार आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातील यशस्वी आणि तज्ज्ञ उद्योजक तसेच शासनाच्या उद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करतील.
या कार्यशाळेत उद्योग सुरू करण्याचे बारकावे, आर्थिक भागभांडवल उभे कसे करावे, उद्योग विकसित कसे करावे, कोणते उद्योग उभारावेत आणि भविष्यात कोणत्या उद्योगांना जास्त संधी मिळेल अशा अनेक गोष्टींचे सखोल मार्गदर्शन मिळेल.
आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी सर्व मातंग समाजातील उद्योजक, अभियंते आणि होतकरू तरुणांना या कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, कारण ही संधी नवीन उद्योजकीय मार्गदर्शन आणि उद्योगातील संधी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.