पुणे जिल्हा बँकेत ४३४ लिपिक पदांची मेगा भरती — तरुणांसाठी सुवर्णसंधी! | Pune Bank Clerk Recruitment 2025 — Golden Opportunity!

Pune Bank Clerk Recruitment 2025 — Golden Opportunity!

पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदासाठी तब्बल ४३४ जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १ डिसेंबर २०२५ पासून सुरू होईल आणि २० डिसेंबर २०२५ पर्यंत चालेल.

Pune Bank Clerk Recruitment 2025 — Golden Opportunity!

अर्ज प्रक्रिया व शुल्क भरपाई दोन्हीही पूर्णपणे ऑनलाईन असतील. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.pdccbank.in येथे भेट देऊन अर्ज सादर करावा.

परीक्षेची तारीख, हॉलतिकीट डाउनलोड करण्याची वेळ आणि कागदपत्र पडताळणीसंबंधी सर्व माहिती बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासत राहणे आवश्यक आहे.

या भरतीमध्ये ७०% जागा पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी, तर ३०% जागा इतर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी राखीव असतील. बाहेरील जिल्ह्यातून पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास उर्वरित पदे पुणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून भरली जातील.

भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता व कागदपत्रांची तयारी ठेवणे लाभदायक ठरणार आहे. ही भरती बँकिंग क्षेत्रात स्थिर नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मेगा सुवर्णसंधी ठरणार आहे.

Comments are closed.