पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारीदरम्यान महापालिका पुन्हा एकदा ‘अभय’ योजना राबवणार असून, थकबाकीदारांना मिळकतकराच्या दंडात तब्बल ७५ टक्के सूट मिळणार आहे.
ही योजना सुमारे पाच लाख मिळकतधारकांसाठी लागू राहणार असून, आधीच्या चार अभय योजनांचा लाभ घेतलेल्या १.४० लाख थकबाकीदारांना मात्र वगळण्यात आलं आहे.
महापालिकेकडे सध्या सुमारे १२,१६१ कोटींची थकबाकी असून, त्यापैकी ९,००० कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात प्रलंबित आहेत. या योजनेमुळे नागरिकांना ६,७०० कोटी रुपयांचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर महापालिकेला किमान ५,४०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल.
महापालिकेने स्पष्ट केलं आहे की करभरणा ऑनलाइन व नागरी सुविधा केंद्रांद्वारे करता येईल, तसेच शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही ही केंद्रं उघडी राहतील.
संकेतस्थळ: propertytax.punecorporation.org

Comments are closed.