पोलीस उपनिरीक्षक भरती: शारीरिक चाचणी जानेवारीत – एमपीएससीची घोषणा! | PSI Recruitment: Physical Test in January!

PSI Recruitment: Physical Test in January!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अखेर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीची शारीरिक चाचणी (Physical Test) जाहीर केली असून ती ६ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान नवी मुंबई पोलीस मुख्यालयात पार पडणार आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या चाचणीत सहभागी होता येणार आहे.

PSI Recruitment: Physical Test in January!

परीक्षेचा निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर झाला होता. त्यानंतर पात्र उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी करण्यात आली. उमेदवारांची यादी, बैठक क्रमांक तसेच कटऑफ गुण एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.

निकाल जाहीर होऊनही अनेक महिने शारीरिक चाचणीचे वेळापत्रक न आल्याने उमेदवारांची चिंता वाढत होती. याविषयीचे वृत्त प्रसारमाध्यमांत झळकल्यानंतर आयोगाने तातडीने दखल घेत अखेर वेळापत्रक निश्चित केले.

जानेवारीतील शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी तयारी अधिक प्रभावीपणे सुरू ठेवावी, असा सल्ला आयोगाने दिला आहे.

Comments are closed.