राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) भरतीसाठी वयोमर्यादेत सवलत द्यावी, या मागणीसाठी इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी रात्री पुण्यात आंदोलन केले.
संयुक्त अराजपत्रित पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत PSI पदासाठी २९ जुलै २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा निश्चित करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मात्र ही जाहिरात अपेक्षित वेळेपेक्षा सुमारे सात महिने उशिरा आल्याने, ठरवलेल्या कट-ऑफ तारखेमुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेबाहेर ठरत आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेत किमान एक वर्षाची वय सवलत द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून गेल्या चार महिन्यांपासून केली जात आहे.
या संदर्भात ८९–९० आमदार आणि आठ खासदारांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करूनही ठोस निर्णय न झाल्याने, नाराज उमेदवारांनी लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

Comments are closed.