प्रोफेसर भरतीला १५ दिवसांची मुदतवाढ!-Professor Recruitment Extended!

Professor Recruitment Extended!

महाराष्ट्रातील प्रोफेसर भरती प्रक्रियेला मोठं वळण मिळालं असून उमेदवारांना आता आणखी १५ दिवसांची संधी मिळाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Professor Recruitment Extended!ही भरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे Professor, Associate Professor आणि Assistant Professor पदांसाठी असून, अर्जदारांना ऑनलाईन अर्जासोबत हार्ड कॉपी २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागेल.

एकूण ७३ शिक्षक पदांसाठी ही भरती असून, आधीच ५०२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. जुन्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, मात्र त्यांच्या अर्जातील त्रुटी या मुदतीत सुधारता येणार आहेत.

स्पर्धा तीव्र असल्याने इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता तातडीने अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Comments are closed.