प्राध्यापक भरती अर्ज मुदतवाढ! – Professor Recruitment Extended!

Professor Recruitment Extended!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक मोठा निर्णय प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे! उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ६ ऑक्टोबर २०२५ च्या शासननिर्णयानुसार उमेदवारांना आता ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.

Professor Recruitment Extended!एकूण १९११ प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांचा समावेश आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत.

पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात सुधारणा किंवा बदल करण्याची संधी देण्यात आली असून, नव्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे. सविस्तर शुद्धीपत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (admin.unipune.ac.in/recruitment) प्रसिद्ध होणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती बाकरे यांनी सांगितले.

रिक्त पदे:

सहाय्यक प्राध्यापक – 47

सहयोगी प्राध्यापक – 32

प्राध्यापक – 32

एकूण पदे: 111

Comments are closed.