सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध शैक्षणिक विभागांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील एकूण १११ पदांसाठी पुन्हा एकदा अर्ज मागवले गेले आहेत. या पदांपैकी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ४७, तर सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी प्रत्येकी ३२ जागा राखीव आहेत.

पूर्वी या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच नवीन उमेदवारांनाही अर्ज करण्याची परवानगी दिली आहे.
ऑनलाईन अर्जाची प्रत १२ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या शिक्षक कक्षात जमा करावी लागणार आहे.
यापूर्वी १३ सप्टेंबर २०२४ रोजी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे प्रक्रिया थांबली होती. आता राज्य शासनाच्या नव्या नियमावलीनुसार विद्यापीठाने भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.
या जाहिरातीसंबंधी शुद्धिपत्र ७ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

Comments are closed.