MPSC साठी प्रतिभा सेतूची गरज!-Pratibha Setu Needed for MPSC Too!

Pratibha Setu Needed for MPSC Too!

श्रीगोंदे (जिल्हा अहिल्यानगर) चे आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत MPSC साठी ‘प्रतिभा सेतू’ योजना सुरू करावी, अशी ठाम मागणी केली आहे.

Pratibha Setu Needed for MPSC Too!UPSC कडून सुरू करण्यात आलेल्या याच योजनेतून, मुलाखतीपर्यंत पोहोचलेले पण अंतिम निवडीत न येणारे उमेदवार खाजगी व सरकारी संस्थांना सुचवले जातात, जेणेकरून त्यांना इतर नोकरीच्या संधी मिळू शकतात.

यूपीएससीप्रमाणेच एमपीएससी ही परीक्षा देखील अतिशय स्पर्धात्मक आहे. राज्यसेवा गट-ब व गट-क परीक्षांमध्ये हजारो विद्यार्थी बसतात, पण अगदीच थोडक्यांची अंतिम निवड होते. मुलाखतीपर्यंत पोहचलेले पण निवड न झालेले उमेदवार देखील खूप गुणवत्तासंपन्न असतात. याच विद्यार्थ्यांची माहिती एकत्र करून एक उमेदवार पोर्टल तयार करावं, जे सरकारी, खाजगी संस्था, CSR प्रकल्प, महापालिका, जिल्हा परिषद, सहकारी संस्था इ. बरोबर शेअर करता येईल – यावर भर दिला गेलाय.

या पद्धतीने तात्पुरती, प्रकल्प आधारित भरती होऊ शकते, शिवाय हे पोर्टल विद्यार्थी सक्षमीकरण, सामाजिक समता, आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. राज्य शासनाने लवकरात लवकर यावर विचार करून योजना राबवावी, अशी मागणी आमदार पाचपुते यांनी केली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

Comments are closed.