भारताच्या सार्वजनिक प्रसारण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था प्रसार भारतीने २०२५ साली विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. मीडिया, ब्रॉडकास्टिंग आणि जनसंपर्क क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
या भरतीत कॉपी एडिटर, व्हिडिओग्राफर, प्रसारण कार्यकारी आणि अतिथी समन्वयक अशा एकूण १४ पदांची भरती केली जाणार आहे.
ही सर्व पदे कंत्राटी (Contractual Basis) पद्धतीने एका वर्षासाठी भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दूरदर्शन भवन, नवी दिल्ली येथे काम करण्याची संधी मिळणार आहे. या पदांसाठी अनुभव आणि भाषेचे प्रभुत्व हे महत्त्वाचे निकष असतील.
कॉपी एडिटर या पदासाठी उमेदवारांकडे पत्रकारिता किंवा जनसंवादातील पदवी किंवा पदव्युत्तर पदविका असणे आवश्यक आहे. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे तसेच संबंधित क्षेत्रातील किमान सात वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी दरमहा ₹८०,००० पर्यंत वेतन दिले जाणार आहे.
व्हिडिओग्राफर पदासाठी १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेतून सिनेमॅटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असावा. ४के आणि डीएसएलआर कॅमेऱ्यांचा अनुभव तसेच मोबाईल पत्रकारिता आणि लघुपट निर्मितीचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या पदासाठी किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक असून वेतन ₹५०,००० पर्यंत राहील.
प्रसारण कार्यकारी पदासाठी मास कम्युनिकेशन किंवा टीव्ही प्रोडक्शनमधील पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा आवश्यक आहे. हिंदी भाषेवर प्रभुत्व असावे तसेच हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये प्रावीण्य असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक असून या पदाचे वेतन ₹५०,००० पर्यंत राहील.
अतिथी समन्वयक पदासाठी उमेदवारांकडे पदवीधर पदवी आणि जनसंपर्क किंवा पत्रकारितेत डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. या पदाचे मासिक वेतन ₹५०,००० ते ₹५५,००० पर्यंत राहील.
सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रसार भारतीच्या अधिकृत संकेतस्थळावर avedan.prasarbharati.org
येथे जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, जर जाहिरात ४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असेल, तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ असेल. सर्व अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. अर्ज करताना कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास उमेदवारांनी hr*******@***il.com
या ईमेलवर स्क्रीनशॉटसह संपर्क साधावा.
ही भरती प्रक्रिया अनुभवी आणि कुशल व्यावसायिकांसाठी एक उत्तम संधी आहे, विशेषतः मीडिया आणि प्रसारण क्षेत्रात स्थिर करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी

Comments are closed.