पॉलिटेक्निक परीक्षा पुढे निवडणुकीचा प्रभाव!-Polytechnic Exams Shifted!

Polytechnic Exams Shifted!

राज्यातल्या निवडणुकांनी पॉलिटेक्निकवाल्यांचं वेळापत्रकच उलथापालथ केलीये हो! हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू असतानाच २ डिसेंबरला नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका असल्यामुळे १ आणि २ डिसेंबरच्या परीक्षा आता पुढं ढकलण्यात आल्या.

Polytechnic Exams Shifted!एमएसबीटीईनं नवीन निर्णय काढून १ डिसेंबरचा पेपर ४ डिसेंबरला आणि २ डिसेंबरचा पेपर ५ डिसेंबरला ठेवला आहे.

यंदा दहावीनंतर प्रचंड विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतल्यामुळे परीक्षा मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. ‘स्कुल कनेक्ट’सारख्या उपक्रमांमुळे प्रवेशात चांगलीच वाढ दिसून आलीये.

पण निवडणुकीचा आदला दिवस, मतदानाचा दिवस आणि त्यानंतरचा दिवस—अशा तीन दिवसांत परीक्षा घेणं अगदीच अवघड. म्हणूनच हा बदल संपूर्ण महाराष्ट्रभर लागू होणार आहे.

एमएसबीटीईचे सचिव उमेश नागदेवे यांनी विद्यार्थ्यांनी हा बदल लक्षात ठेवून नियोजन करावं, असं आवाहन केलं आहे.

Comments are closed.