पोलीस भरतीची मैदानी चाचणी आजपासून!-Police Recruitment Trials Begin Today!

Police Recruitment Trials Begin Today!

महाराष्ट्र पोलिस दलात एकूण १५,३०० पदांसाठी भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. या अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात ४६२ रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Police Recruitment Trials Begin Today!या भरतीसाठी बुधवार, ११ फेब्रुवारीपासून मैदानी व शारीरिक चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या चाचण्या भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडांगणावर घेतल्या जात आहेत.

भरती प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे, आरएफआयडी प्रणाली आणि बायोमेट्रिक तपासणीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांची नोंदणी आणि चाचण्या अधिक शिस्तबद्ध पद्धतीने होत आहेत.

उमेदवारांना एकूण ५० गुणांची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर व १०० मीटर धावणे तसेच गोळाफेक, तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर व १०० मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी घेतली जाणार आहे.

Comments are closed.