महाराष्ट्र पोलीस दलात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती होत आहे. यामध्ये सन २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. गृह विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस शिपाई पदे महत्त्वाची आहेत. रिक्त पदांमुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढतो. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी रिक्त पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत.
भरतीसाठी पदसंख्या:
पोलीस शिपाई – १२,३९९
पोलीस शिपाई चालक – २३४
बॅण्ड्स मॅन – २५
सशस्त्र पोलीस शिपाई – २,३९३
कारागृह शिपाई – ५८०
भरती प्रक्रिया जिल्हास्तरावर ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेऊन राबविली जाईल. अर्ज मागवणे, छाननी व पुढील प्रक्रियेची तयारी सुरू आहे.