महाराष्ट्र गृह विभागाने जाहीर केलेल्या नवीन निर्णयानुसार, पोलीस भरती २०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता ७ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना १० डिसेंबर २०२५ पर्यंत अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. ही मुदतवाढ अर्ज सादर करण्यात अडचण आलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

या भरतीत १५,६३१ पदे भरली जाणार आहेत. त्यात पोलीस कॉन्स्टेबलसाठी १२,३९९, पोलीस कॉन्स्टेबल चालकासाठी २३४, जेल कॉन्स्टेबलसाठी ५८०, SRPF कॉन्स्टेबलसाठी २,३९३ आणि पोलीस बँड्समनसाठी २५ पदे समाविष्ट आहेत. या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वय १८ ते २८ वर्षे असावे, तर आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये, तर आरक्षित वर्गासाठी ३५० रुपये ठेवण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी policerecruitment2025.mahait.org किंवा mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, अशी शासनाची विनंती आहे.
ही संधी पोलीस दलात आपले स्वप्न साकार करण्यासाठी अंतिम सुवर्णसंधी मानली जाते.

Comments are closed.