राज्यात भव्य पोलिस भरती! १५,६३१ पदांसाठी अर्ज सुरू — २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत संधी! | 15,631 Police Vacancies Announced in Maharashtra! Apply from Oct 29!

15,631 Police Vacancies Announced in Maharashtra! Apply from Oct 29!

राज्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून तब्बल १५,६३१ पोलिस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यात पोलिस शिपाई, चालक शिपाई, सशस्त्र पोलिस शिपाई, बॅण्डसमन आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे.

15,631 Police Vacancies Announced in Maharashtra! Apply from Oct 29!

अर्ज करण्याची मुदत: २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ: policerecruitment2025.mahait.org

जिल्हानिहाय जागा:

  • सोलापूर ग्रामीण – ९० पदे
  • सोलापूर शहर – ९६ पदे
  • राज्य राखीव पोलिस बल व कारागृह शिपाई – सुमारे ५५ पदे

महत्त्वाच्या सूचना:

  • प्रत्येक उमेदवारास एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करता येईल.
  • वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद ठरतील.
  • मैदानी चाचणीत किमान ४०% गुण आवश्यक असतील.
  • मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षेसाठी १० पट उमेदवारांची निवड केली जाईल.

रिक्त पदांचे तपशील:

  • पोलिस शिपाई – १२,३९९
  • चालक शिपाई – २३४
  • सशस्त्र पोलिस शिपाई – २,३९३
  • कारागृह शिपाई – ५८०
  • बॅण्डसमन – २५
    एकूण: १५,६३१

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग – ₹४५०
  • मागास प्रवर्ग – ₹३५०

ही भरती प्रक्रिया दीर्घकाळापासून प्रलंबित होती, मात्र आता गृह विभागाने तातडीने भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील हजारो युवकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार असून, पोलिस सेवेत दाखल होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे!

Comments are closed.