पदवीधरांसाठी मोठी बँकिंग संधी! पंजाब नॅशनल बँकेत ५,१३८ अप्रेंटिस पदांची भरती सुरू! | PNB Apprentice Recruitment: 5,138 Posts Available!

PNB Apprentice Recruitment: 5,138 Posts Available!

नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ‘अप्रेंटिस’ पदांसाठी एकूण ५,१३८ रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत असून २४ फेब्रुवारी २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://pnb.bank.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.

PNB Apprentice Recruitment: 5,138 Posts Available!

जाहिरातीनुसार, या भरती अंतर्गत निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी लेखी परीक्षा १ मार्च २०२६ रोजी घेतली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे त्या स्थानिक भाषेचे वाचन, लेखन व संभाषणाचे ज्ञान अनिवार्य आहे. उमेदवारांचे वय किमान २० वर्षे व कमाल २८ वर्षे असावे. वयाची गणना १ जानेवारी २०२६ पासून केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरावे लागेल. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹९४४, ओबीसी/ईडब्ल्यूएससाठी ₹७०८, तर एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी व ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी ₹२३६ शुल्क निश्चित करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी, स्थानिक भाषा चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल.

या प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाची अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कालावधीत ग्रामीण, अर्ध-ग्रामीण आणि शहरी भागातील अप्रेंटिसना दरमहा ₹१२,३००, तर महानगरांमध्ये ₹१५,००० मासिक मानधन दिले जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात करिअरची सुरुवात करण्यासाठी ही पदवीधरांसाठी एक उत्तम संधी मानली जात आहे.

Comments are closed.