देशातील शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशभरातील तब्बल ७,९९३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नव्हता, तरीसुद्धा या शाळांमध्ये २०,८१७ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक शून्य पटसंख्येच्या शाळा पश्चिम बंगालमध्ये (३.८१२) आहेत, जिथे १७,९६५ शिक्षक नेमले गेले आहेत. त्यानंतर तेलंगण (२,२४५ शाळा) आणि मध्य प्रदेश (४६३ शाळा) या राज्यांचा क्रमांक लागतो.
त्याचवेळी, देशातील एकशिक्षकी शाळांची संख्या देखील चिंताजनक आहे. देशभरात १ लाखांहून अधिक एकशिक्षकी शाळा आहेत, ज्यामध्ये सुमारे ३३ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- आंध्र प्रदेशात सर्वाधिक एकशिक्षकी शाळा, त्यानंतर उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, आणि पश्चिम बंगाल यांचा क्रमांक लागतो.
- २०२२-२३ मध्ये १,१८,१९० एक शिक्षकी शाळा होत्या, तर पुढील वर्षी ती संख्या १,१०,९७१ पर्यंत घटली आहे.
दरम्यान, काही राज्यांनी शिक्षण व्यवस्थेत शून्य विद्यार्थी असलेल्या शाळांचा प्रश्न पूर्णपणे सोडवला आहे.
हरियाणा, महाराष्ट्र, गोवा, आसाम, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये शून्य पटसंख्येची एकही शाळा नाही.
त्याचप्रमाणे, केद्रशासित प्रदेशांपैकी दिल्ली, पुटुच्चेरी, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, अंदमान-निकोबार, दमण-दीव आणि चंदीगड येथेही अशी एकही शाळा नाही.
तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थी नसलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती ही शिक्षण धोरणातील गंभीर त्रुटी असून, संसाधनांचा अपव्यय टाळण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Comments are closed.