PM किसानचा 21 वा हप्ता!-PM Kisan 21st Installment!

PM Kisan 21st Installment!

केंद्र सरकारनं PM किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता जाहीर केला आहे आणि 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हरियाणा, हिमाचल येथील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 प्रति शेतकरी जमा केले गेले.

PM Kisan 21st Installment!महाराष्ट्रातही पावसानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यामुळे या हप्त्याची अपेक्षा वाढली आहे. आधी 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झाला होता, ज्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹20,500 कोटी रुपये जमा झाले होते.

महाराष्ट्रातील शेतकरी या नव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध अहवालानुसार, हा लाभ ऑक्टोबर 2025 च्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे 1.5 कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेतून लाभ घेतात.

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा हप्ता विशेषतः महत्त्वाचा आहे — पेरणी, खते आणि सणासुदी खर्चांसाठी आर्थिक मदत होणार आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितलेय की, पंजाब, हरियाणा आणि हिमाचलमधील 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटींहून अधिक निधी हस्तांतरित झाला आहे, ज्यात 2.7 लाख महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.

PM किसान योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत मिळते, सहा हजार तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी ₹2,000) थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

महत्त्वाच्या अटी:

  • e-KYC अनिवार्य,

  • आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे,

  • जर हे पूर्ण नसेल तर हप्ता मिळण्यात विलंब होऊ शकतो किंवा नाकारला जाऊ शकतो.

लाभार्थ्यांची तपासणी:
शेतकरी pmkisan.gov.in वर “Beneficiary Status” किंवा “Village‑wise List” मध्ये आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून आपली नावे तपासू शकतात.
अधिक माहिती साठी हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 011‑24300606 येथे संपर्क करता येईल.

Comments are closed.